Poems(Marathi)

.....हृदयी कोंडून ठेवला होता असा काही आनंद
वेड्या मनाला जणू कधी माहितच न्हवते

पंख लावूनी आनंद नाचत होता
अगदी त्याच्या उंची पेक्षाही वर उडत होता
सखी की प्रियसी व्हावे मी
याचा अंदाजच येत नव्हता....
पण खरे सांगू? प्रश्न तोच टाळत होता.....

भेट आपूली झाल्या पासूनी
गुंतता हृदया ही तुमच्या पाशी
एक काळ उसवून गेला

शोधत रहिले मी काहितरी
कधी तुमच्या स्पर्शात तर कधी तुमच्या डोळ्यात

हवे हवसे होते काही तरी वेगळेच
मन सांगत होते
ओंझळीत काळाच्या झोपून ठेविले पाहिजे

असे काहितरी जे पाहिले तुमचे नी मग फक्त ते माझेच असेल
मनातल्या अनंदा पेक्षा
ओठाच्या चुंबना पेक्षा, मिठीच्या गाठी पेक्षा

अशी एखादी गोष्ट जी राहील ध्यानी मनी जास्त, एका क्षणा पेक्षा
बाहुल्या हरवून जातील,
प्रेम पत्रे विरून जातील
भावना तर नक्की विरघळून जातील

पण प्रत्येक आवा भावा च्या मागले

शब्द टिकून रहतील
समजताच एका क्षणातच ही
की जे मी शोधत होते
ना स्पर्शात ना हृदयात
ते माला फक्त तुमच्या शब्दातच मिळणार होते!

 

कसे  वेगळे व्हायचे
तुमच्या या आठवणीं पासून

कसे वेगळे करायचे
स्वतःला या तुमच्या भेटी-गाठिंतून

कशा करायच्या भावना माझ्या वेगळ्या
तुमच्या, फक्त तुमच्या पासून

डोळे मिटताच तुमचा स्पर्श होतो मनी
श्वास घेताच येते तुमच्याच नवाची ध्वनि

पाऊल उठते ते नेते तुमच्याच मिठीत
डोळे भरूनी तुमच्याच खांद्यावर मान टाकून येतो माझा कंठ गाठूनी

मनाच्या, देहाच्या तुमच्या प्रत्येक चाहुली पासून
कशी वेगळी करायची माझ्या प्रीतीची सावली

कुठे तरी असे वाटते
तुम्हीच का करत नाही माझी मदत

सोलूनी उपटूनी टाकत का नाही
माझ्या या वेड्या प्रेमाचा गुंता

नका देऊ तुमचा हात
नका करू कुठलीही साथ

भिजवून जाऊदे आसवानी, मन देह माझे
एकटेपणाच्या कडक उन्हात, वाळून जाईल सगळीच बात....

 

 

पावसा-सारखे, मन आसवांनी  चिंब भिजून गेले
शोधात माऊली मना, मी हरवून गेले
चिमुकल्या माणसासारखे.... स्वप्नेही चिमुकले होते
उदंड वारा की भावना, हेच वादळात समजले नव्हते, कारण..
हिरव्या वनात, एक झाड सुकून गेले होते...

काळे ढग फोडूनी, आली किरण एक...
मनी आशा उमटली, कळेना होते मी, जागी का स्वप्नी
दिसला अचानक तो इंद्रधनुष्य, विचार आला,
असेल का त्याच्या तळी …..
माझा मनस्वी?

 

उंबरठा ओलांडोनि..
वाटले मन हलके होईल..
प्रेमाचा स्पर्श होताच, श्वास फुलून येईल
शोधत होते डोळे माझे, प्रीतिचा ओलावा
काही हरून, काही हरवून
बसले मी एकांतात,
सुवास दरवळला तेवढ्यात, ओढूनी नेले त्याने मागच्या अंगणात,
आणि प्रतिबींबला आनंद मनात..
बघताच हिरवळीत अंग पसरून
होता फुलला पारिजात....